आवाहन - थॅलेसेमिया जागरण अभियान
थॅलेसेमिया काय आहे ?
थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक रक्तविकार असून तो पालकांकडून अपत्यांमध्ये संक्रमित होतो. हा आजार असलेल्या मुलांना आयुष्यभर सातत्याने रक्त भरून घ्यावे लागते. अशा सर्व मुलांना सर्वोच्च तंत्रज्ञानाने तपासलेले रक्तघटक जनकल्याण रक्तपेढी संपूर्णत: मोफत देते. यामुळे अशा बालकांचे आयुर्मान वाढते. दुसऱ्या बाजुला, थॅलेसेमियाग्रस्त म्हणून कुणीच जन्माला येणार नाही, यासाठी व्यापक प्रबोधनाची गरज आहे.
दि. ८ मे अर्थात ‘जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या’ निमित्ताने जनकल्याण रक्तपेढीने दि. १ मे ते ८ मे २०२२ दरम्यान थॅलेसेमिया जागरण अभियानाची योजना केली आहे. याव्दारे थॅलेसेमियाच्या संदर्भातील महत्वपूर्ण माहिती समाजातील सर्व स्तरांमध्ये पोहोचविण्याचा अधिकाधिक प्रयत्न केला जात आहे. या अभियानात स्वयंसेवक म्हणून सहभागी होऊन पुढील प्रकारे आपले योगदान द्या -
- थॅलेसेमिया-माहितीचा सर्व उपलब्ध माध्यमांतून व्यापक प्रसार
- थॅलेसेमिया-प्रबोधनासाठी साहित्यनिर्मिती (फलक, घोषणा, व्हिडीयोज, निबंध, कथा इ.)
- थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी जनकल्याण रक्तपेढीस आर्थिक सहयोग - किमान रु. २५०० (एका रक्तापिशवीचा खर्च)
- आपल्या संपर्कातून यासाठी इतरांनाही प्रेरित करणे
स्वयंसेवक म्हणून नोंदणी, थॅलेसेमियाबाबतची माहिती, देणगी देणे इ. साठी इथे भेट द्या -
Donate Now